वैजयंतीच्या टेकडीवर मी एकटाच गेलो.एक घरटं दिसलं पानाच्या जाळीत.रिकामं.पाखरं ऊडून गेलेली.ते अलगद हातीं घेतलं.काही नुकतीच गळालेली पानंही ऊचलून हाती घेतली...घरी आलो.वैदेहीस न दाखवतां कपाटात ठेवलं...
दुसरा दिवस चाफ्याच्या सुगंधात नाहलेला...
मी वैदेहीस बोलावलं.ती आली.जवळच बसली.तिला डोळे मिटायला सांगितलं..माझ्या हातीं होतं पानांच्या आंत शिवलेलं घरटं! जे रात्री मी शिवलेलं.
तिला डोळे उघडायला सांगून मी ते तिच्या हातीं दिलं..तिचे सुंदर डोळे आश्चर्यानं मोठे झाले.चेहर्यावर आरक्तवर्णाची पावलं हलकेच उमटून गेली...
मी म्हणालो.," ते कानापाशी धर." तिनं तसं केलं.
"वारं सुटल्यावर येतो तसा आवाज पानांच्या पोकळीतून येतोय मंदसा " ती म्हणाली..मी तिच्याकडं पहात म्हणलं.,"तो श्वासाचा आवाज आहे वैदेही! शब्दांनी किती धांवायचं तुझ्यामागं.." असं म्हणत मी घरटं माझ्या हातीं घेतलं.वरुन पानं हलकेच उलगडली..आणि तिला पहायला सांगितलं..आंतल्या घरट्यात मऊ कापूस होता.त्यावर काही कागदांचे तुकडे..!तिनं ते वेचून घेतले...प्रत्येक कागदावर एकेक शब्द होता...!!
Tuesday, October 8, 2013
वैदेही आसमंत माझे..
Subscribe to:
Post Comments (Atom)
ही वैदेही अगदी निष्ठुर वाटतेय मला.......पार्वतीनी शंकरासाठी केली त्याहीपेक्षा अवघड तपश्चर्या तुम्हाला करावी लागणार आहे असे दिसतेय पराग..........
ReplyDeleteनाही तसं नाही..वैदेहीनं ठरवलं तरी ती निष्ठूर नाही होऊ शकत.चांदणं दाह नाही उत्पन्न करत ....
ReplyDelete