Tuesday, October 8, 2013

मला वाटतं...

एखाद्या गोष्टीस गतीमुळं वस्तुमान प्राप्त होतं.वस्तुमान भोवतालचं अवकाशही वक्र करतं.आईनस्टाईनचा 'सापेक्षतावाद' हेच सांगतो..
विषय वासनांकडील गती ही मनास जडत्वं प्रदान करते का.? देह नामक वस्तुमानाशी मन म्हणून बांधलं जातं का.? अवकाशाचं वक्रिभवन होऊन जणू आपलं या पृथ्वीतलावर येणं होतं का.? व या बद्धतेतून बाहेर पडून मुक्त व्हावं असं वाटतं का.?...
कदाचित आपण मुळात मुक्त आहोत.त्यामुळंच मुक्तीची आंस अंतरी आहे.सगळी शक्ति मूलाधारापाशी पडून राहते.मग भोगकेंद्रित जीवनप्रणाली सुरु होते..उर्ध्वदिशेने ती प्रवाहित तेव्हा होते जेव्हा मुक्तीकडे जावेसे वाटते..स्थूलाकडून सुक्ष्मतेकडे व सुक्ष्मतेकडून मूळ अवस्थेत ती विलिन होते.
अणूमधे पॉझिटिव्ह;निगेटिव्ह भाराचे प्रोटॉन;ईलेक्ट्रॉन व उदासिन न्यूट्रॉन असतात.आपलं मनही तसंच समाज मनही. म्हणून एखाद्या घटनेबाबत समर्थन;विरोध;उदासिनता सारं दिसतं..
आपण खरंतर पॉझिटिव्हही नाही ;निगेटिव्हही नाही  उदासिनही नाही.विषयाकडील गती;घटनेची वक्रता यावरुन कल ठरतो..व जडत्वं प्रदान होतं इतकंच.! आपण त्या पलिकडे आहोत..
'सापेक्षवादा'नुसार सारे एकमेकांच्या आधारी ऊभे.व्याख्याही..पॉझिटिव्ह काय? तर जे निगेटिव्ह नाही ते..!जे दोन्ही नाही ते उदासिन...!
गीतेमधील स्थितप्रद्न्यता म्हणजे या पलिकडे जाणे..आपण मुळातच पृथक आहोत..
अनंतावस्था अणूच्या संसारात बद्घ होते..!अणूच्या सर्व गुणांच्या पलिकडं आपलं मूळ रुप..!!
अनंत.! अणूच्या एका गुणानं 'भारुन' त्याच्याशी तादात्म्य व्हायचं..हसायचं रडायचं उदास व्हायचं...मग ईश्वर स्पर्श करतो. म्हणतो,"..कुठं हरवलास..?" मग 'स्व'ची जाणिव होते...!व त्याच्या स्पर्शाने त्याच्यातच विरघळून जाणं घडतं..!आपण अनंत आहोत हे जाणायलाही पृथकत्वं उरत नाही...!तिच मुक्ति...!!

No comments:

Post a Comment