Sunday, October 6, 2013

कधी वाटते जावे दूर निघूनी...

'प्यासा' चित्रपटात शेवटी गुरुदत्त वहिदा रेहमानला म्हणतो .."दूर निघून जाणार आहे मी..येतेस बरोबर.?" त्या आधीचे त्याचे संवाद प्रत्येक संवेदनशील कलाकाराच्या मन:स्थितीचं प्रातिनिधित्व करतात. ज्याला कला'विकायला'जमली;नव्हे ज्यांना जे विकलं जातं ते जन्मास घालायला जमलंय त्यांसाठी ते नाहीत...
खरं प्रेम नशिबाची गोष्ट.!मला अलिकडे सल्ल्यांचं भय आहे.एखाद्या ब्रेनट्यूमर झालेल्या व्यक्तिस तो नुसता कण्हला तर केवळ फ्लूचा अनुभव असलेल्यानं त्याच्याकडे किंव करुन उपहासानं हसावं.असं या जगात चालतं."जग असंच असतं.असंच जगायला लागतं..अमूक;तमूक..!!"असे अनेक सल्ले.भोगण्याचा माझा अहंकार वाटेल कुणाला म्हणून वाटतं मौन रहावं.
इथं कपड्यांवरुन ऒळख ठरते.पायातल्या चपलांवरुन लायकी.गाडी धर्म झाली.बंगला प्राण..! जे पैसे देऊन आणलं त्यांस किंमत..काळजीस किंमत नाही.स्पंदनांना नाही..!पैशाच्या खणखणाटात वृद्ध आईचं कण्हणं ऐकू येत नाही.छोटेखानी घर;गरजेपुरती गाडी..इथं थांबणं होत नाही.मग गरजाही मोठ्या होऊ लागतात.मर्सिडिझ गरज होते.जिथं सेलिब्रिटी आदर्श होतात.तिथं मूल्य ऊतरतीस लागतात.ऊंच घरं इतक्याचसाठी घ्यायची कुणाची नजर पोचू नये..पण आंतील दुश्वासाचे सूर बाहेर पडू नये हे कारण कुणी जाणत नाही..पैसा;अधिकारांचं राज्य सगळीकडे.दुसर्याची उपेक्षा.!कला;गुण;नितीमत्तेपेक्षा पैसा श्रेष्ठ..!
सागराची गाज 'पार्ट्यांच्या' आवाजात ऐकूं येत नाही.पाऊसधारा;धुकं हा अनुभव राहिला नाही.कला अनुभव अन् अनुभूती प्रदान करते.पण लोकांना ते नकोय...जे उपयुक्त आहे ते सारं  जपतील कारण पैसे मोजलेत..!अशीच लोकं जास्त..
हृदयाची धांव असमर्थतेपर्यंत..तेथून चलाख मेंदूंचं राज्य..!जगण्यासाठी दोहोंचा समन्वय हवा..पण चलाख मेंदूनं 'खटला'जिंकलाय....!
थांबावं;वाटतं यावरही कुणी सल्ला देईल...!

No comments:

Post a Comment