वैदेही तुझ्यासमोर शब्द पांगळे आहेत.सगळे कसे समुहानं येतात एकमेकांचा हात पकडून..वरच्या रेषेचा आधार घेऊन ऊभे राहतात..मी मनापासून जाणतो तू त्यांना कौतुकानं ऒंजळीत घेतेस ..मग माझं न ऐकता एखादा चुकार शब्द तुझ्या ऒंजळीत ऊडी मारतो..तुझ्या कोमल स्पर्शानं त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.तू काय आहेस; कोण आहेस....................हे सांगायला एकतरी शब्दं सामोरा आला का पहा..!मौन होतो मी..
तू माझं काव्य ..तूच कथा..तू नसलीस की शब्द रुसतात मजवर..कितीही बोलवलं तरी ज्यांचं काम नाही त्याना पाठवतात...
तुला पाहण्यासाठी चांदणं चंद्रापासूनचा लांबचा प्रवास करतं.ते तुझ्या स्पर्शासाठी धडपडतं..ते अंगणी ऊतरतं.खिडकीतून आतही...तुझ्यासाठी त्याचं कसं हे धाडस...!!
एक विनवितो तुला; तू चांदण्यात येऊ नकोस..तू खोटा म्हणून त्या आकाशीच्या चंद्राशी मला वाद घालायचा नाहीए..वारा हलकेच तुला स्पर्शेल तेव्हा भान असूदेे.. तुझ्याकडे पाहणारे सारे लता;वृक्ष;नदी तुझ्याशी तादात्म्य होतात..तेही शहारतील याचं स्मरण असूदे..तुझ्याच श्वास निश्वासाच्या बंदिशीवर सारे चराचर डोलते..तुझ्याचसाठी प्राजक्तफूल बरसते..तुझ्या स्पर्शानं देठांचे रंग त्यांच्या गहिरे होतात..गुंफून फुलांना जेव्हा तू केसात माळतेस...आकाशगंगा लेवून ऊभे आसमंत भासतेस..!!
तुझाच..
पराग
Friday, September 6, 2013
वैदेहीस माझं पत्रं...
Subscribe to:
Post Comments (Atom)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteतू संजतेस तसं नाही. वैदेहीसवें मी प्रत्यक्षात जगतो..श्वासात अन् स्पंदनात...ती जिवंत आहे..ती जन्मोजन्मी भेटली मला.यावेळेस वेळ झालाय मात्र!
ReplyDelete