Friday, April 25, 2014
Thursday, April 24, 2014
ती एक चंद्र ..
निरोप घेताच मी लोचनात तिच्या आसवांची दाटी
कितीही थोपविले तरीही चंद्र भिजलाच शेवटी..
उजळली पूर्वा अंगणी केशरी प्रकाशसडा
तरीही तुझेच नांव कोणा पांथस्ताच्या ओठी..
मावळला असा कसा चंद्रही अवेळी
आगमनाची तुझ्या बातमी तयास दिली कोणी खोटी..
.....
हाय बदलला काळ कैसा आहे
भौतिकतेच्या कैदेत संस्कृती रडते आहे
ईंद्रियांच्या बोभाटासमोरी थिजली वाणी
अहंतेच्या महापूरात भिजले मंगळसूत्राचे मणी
मंदिराच्या आश्रयास कुंकू निथळते आहे
चार भिंतीतील संसार अहंकार अस्मितेचा
दुश्वासाने आहे कोंडतो श्वास गर्भाचा
जन्मणारे अपत्य आधीच जखमी आहे
तू भ्याड म्हणून केले सहनशीलतेस ओशाळवाणे
समर्थनाच्या मैफिलीत अता व्यभिचाराचे गाणे
ठाणवाईच्या प्रकाशात संतांचे वचन विझते आहे
निखळली वीट घर पवित्रतेचे अता भकास
स्वैराचाराच्या मंदिरास निर्लज्जतेचे कळस
मातीतून घडताना प्रत्येक वीट शहारते आहे
उद्ध्वस्त घरट्याने जायचे कोठे
पक्षानेच घेतली वादळाची बाजू जिथे
वस्तीस बुडविल्याचा गर्व धरुन महापूर वाहतो आहे
बेबंद नयनांचे भिक्षेस निमंत्रण
रावणच पुसतो आहे लक्ष्मणरेषेची खूण
भोगाच्या झळांनी अग्नीदिव्यास तुच्छ ठरवले आहे